तो अज्ञान गा पांडवा - संत ज्ञानेश्वर



तो अज्ञान गा पांडवा। आणि तोहि तोचि जाणावा।
 जो इंद्रियें अव्हासवा । चारी एथ ।।

न करावे तें करी। असंभाव्य मनीं धरी ।
 चिंतू नयें तें विचारी । जयाची मती ।।

रिघे जेथ न रिघावे । मागे जें न घ्यावें।
 स्पर्शे जेथ न लागावें । आंग मन ।।

न जावें तेथ जाये। न पाहावें तें जो पाहें।
 न खावें तें खाये । तेवींचि तोषें ।।

न धरावा तो संगु । न लागावें तेथ लागु । 
नाचरावा तो मार्ग। आचरे जो ।।

नायकावें तें आइके। न बोलावें तें बके। 
परि दोष होतील हें न देखे। प्रवर्ततां ।।

तयाचेनि आंगलगें। अज्ञान जगी दाटुगें ।
 जें सज्ञानाहि संगें । झोंबों सके।।

श्री ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा ओवी क्रमांक 771, 773 ते 777, 780

अश्या प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपले WhatsApp Channel जॉईन करा.
👇👇