सुखाचे ते सुख - संत नामदेव | Sukhache te sukh - sant Namdev | Marathisahitya.in



दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख ।
पाहतां श्रीमुख गोविंदाचे ।।१।।

रंगणी रांगत गुलगुल बोलत ।
असुर रूळत चरणांतळी ।।२।।

नामा म्हणे हाती लोणीयाचा उंडा ।
 गौळणी त्या तोंडा भुललिया ।।३।।

अश्या प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपले WhatsApp Channel जॉईन करा.
👇👇
https://whatsapp.com/channel/0029VaAdqdhCxoB5NM1mPL1h