अखंड - महात्मा फुले | Akhand - Mahatma Phule | Marathisahitya.in


स्त्रीपुरुषें सर्व कष्टकरी व्हावें ।। 
कुटुंबा पोसावें ।। आनंदाने ।।ध्रु।। 

नित्य मुलीमुलां शाळेंत घालावें ।। 
अन्नदान दयावें ।। विदयार्थ्यास ।।२।। 

सार्वभौम सत्य स्वतः आचरावें ।। 
सुखे वागवावें ।। पंगु लोकां ।।३।। 

अशा वर्तनानें सर्वा सुख दयाल ।। 
स्वतः सुखी व्हाल ।। जोती म्हणे ।।४।।

 सर्वांचा निर्मीक आहे एक धनी ।। 
त्याचें भय मनीं ।। धरा सर्व ॥ध्रु॥ 

न्यायानें वस्तूचा उपभोग घ्यावा ।।
 आनंद करावा ।। भांडू नये ||२|| 

धर्म राज्य भेद मानवा नसावे ।। 
सत्यानें वर्तावें ।। ईशासाठीं ।।३।।

 सर्व सुखी व्हावे भिक्षा मी मागतो।।
 मनुजा सांगतों।। जोती म्हणे ।।४।।

अश्या प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपले WhatsApp Channel जॉईन करा.
👇👇