ओंव्या गाऊं कौतुकें तूं येरे बा विठ्ठला ।। १ ।।
जीवशिव दोनी खुंटे गे प्रपंचाचे नेटें गे।
लावुनी पांच बोटें गे तूं येरे बा विठ्ठला ।। २ ।।
सासु आणि सासरा दीर तो तिसरा ।
ओंव्या गाऊं भ्रतारा तूं येरे बा विठ्ठला ।। ३ ।।
बारा सोळा गडणी अवघ्या कामिनी ।
ओव्या गाऊं बसूनि तूं येरे बा विठ्ठला ।।४ ।।
प्रपंचदळण दळिलें पीठ भरिलें ।
सासुपुढें ठेविलें तूं येरे बा विठ्ठला ।। ५ ।।
सत्त्वाचें आधण ठेविलें पुण्य वैरिलें ।
पाप तें उतूं गेलें तूं येरे बा विठ्ठला ।। ६ ।।
जनी जातें गाइल कीर्त राहिल ।
थोडासा लाभ होईल तूं येरे बा विठ्ठला ॥७॥
अश्या प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपले WhatsApp Channel जॉईन करा.
👇👇