जलाविण मासा - संत बहिणाबाई | Jalavin Masa - Sant bahenabai | Marathisahitya.in


जलाविण मासा जैसा तळमळी । 
चातक भूतळीं मेघ इच्छी ||१||

तैसे भक्तीलागीं कळवळे मन। 
भक्ति हे निर्वाण तेच खरी ||२||

एकुलता पुत्र सांपडे वैरीया । 
कुरंग हा ठाया पारधीचे ॥३॥

पतिव्रता पतिवियोगें तडफडी । 
भ्रमर प्राण सोडी पुष्पावीण ||४||

तृषाक्रान्त जैसा इच्छित जीवन । 
चकोर हा जाण चंद्रामृता ।।५।।

बहिणी म्हणे तैसी आवडे हरिभक्ति । 
तेव्हां चितवृत्ति वोळखावी ||६||

श्री संत बहिणाबाई यांच्या गाथा अभंग क्रमांक 155

अश्या प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपले WhatsApp Channel जॉईन करा.
👇👇