पुस्तक - बाजिंदलेखक - पै. गणेश मानुगडेप्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणेपृष्ठ संख्या - १५८
ही शिवरायांची गुप्तहेर संघटना आणि बाजिंद यांच्या बद्दल एक ऐतिहासिक रहस्यकथा आहे. पूर्वी रायगडावरून कडेलोट केला जायचा आणि ती प्रेत येऊन पडायची धनगरवाडी जवळील जंगलात. त्याच्या वासाने जंगली श्वापदांचा तेथे सारखा वावर असायचा. बऱ्याच वेळा लोकांना संध्याकाळी मेंढ्या घेऊन परत येताना वाघ दिसायचे. या त्रासाने कंटाळून धनगरवाडीचा प्रमुख सखाराम व त्याचे तीन सवंगडी महाराजांना याबाबत कळवण्यास रायगडावर निघाले असतात. खंडोजीची त्यांच्याशी रहस्यमयीरित्या भेट. तो त्यांना महाराजांपर्यंत पोहचवण्याचे आश्वासन देतो. व पुढे महाराजांशी त्यांची भेट होते का ?
सावित्री व खंडोजीची प्रेमकथा ! सावित्री कोण होती ? खंडोजी कोण ? बाजिंद कोण ? यांचा बहिर्जी नाईक यांच्याशी काय संबंध असे अनेक प्रश्न पडतात. व जसजसं आपण पुढं वाचत जाऊ तशी आणखी उत्कंठा वाढते. नंतर शिर्के व बहिर्जी नाईक यांचे युद्ध नाईकांचा चेला खंडोजी त्यांना दगाबाजी करतो. मग पुढे ते त्याच काय करतात ? असे अनेक प्रश्न पडत जातात व शेवटी त्या सर्वांची उत्तर मिळतात.
बाजी व मुघल सरदार हुसेनखान यांच्यातील युद्ध. हुसेनखान बाजीला दगा देतो व मारण्याचा प्रयत्न करतो. मग बाजीच्या एका आवाजावर जंगलातील सर्व पशू- पक्षी एवढेच नाही तर कीटक, मुंग्या सुद्धा त्याच्या मदतीला धाऊन येतात. सर्व सुनसान होते जिकडे तिकडे मृतदेह पडलेले असतात. बाजीला प्राण्यांच्या गूढ भाषेचे ज्ञान असते त्यामुळे त्याच्या एका आवाजावर मदतीला सर्व पशू पक्षी आलेले असतात. परंतु युद्धात तो गंभीर जखमी होते. पण मृत्यू होण्याअगोदर तो ते ज्ञान त्याच्या वारसाला देतो. तो वारस कोण ?
बाजिंदच शापित जंगल ! जंगल खरचं शापित होत का ? बाजिंद कोण होता ? त्या जंगलात गेलेलं कोणीही परत येत नव्हत मग सावित्री व खंडोजीच त्या जंगलात गेल्यावर काय होत ? ते वाचतात का ? असं अनेक प्रश्न निर्माण होत जातात. जसं जसं आपण पुढं वाचत जातो तस आपण आणखीच रहस्यात गुंतून जातो. शेवटी बाजिंद व बहिर्जी नाईक यांचा आमनासामना होतो. त्यात बहिर्जी नाईकांची चातुर्य. असं अनेक रहस्यांनी भरलेलं पुस्तकं आहे नक्की वाचा.