उदास विचारें वेच करी ।। धृ ।।
उत्तम चि गती तो एक पावेल ।
उत्तम भोगील जीव खाणी ||१||
परउपकारी नेणें परनिंदा ।
परस्त्रिया सदा बहिणी माया ||२||
भूतदया गाईपशूचें पालन ।
तान्हेल्या जीवन वनामाजी ||३||
शांतिरूपें नव्हे कोणाचा वाईट ।
वाढवी महत्त्व वडिलांचें ।।४।।
तुका ह्मणे हें चि आश्रमाचें फळ ।
परमपद बळ वैराग्याचें ।।५।।
श्री तुकारामबाबांच्या अभंगाची गाथा
अभंग क्र. २८६४
अश्या प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपले WhatsApp Channel जॉईन करा.
👇👇