सांगितली खूण मने माझ्या - संत नामदेव | Sangitali Khun mane mazya | Marathisahitya.in



पाहे पर दारा जननीसमान । 
द्रव्यही पाषाण - सम मानीं ॥ १ ॥ 

पराव्याकारणें प्राण वेची आतां ।
 जाणें पर-व्यथा अंतरीची ॥२॥

 विहित संतोष धरीं बा मानसीं ।
 कीं पर-लोकासी जाणें आहे ॥३॥

 सर्व काळ प्रीति संतांचीया संगें । 
गावें अनुरागें हरी-नाम ।।४।।

 सर्वांभूतीं सम ठेवूनीयां बुद्धी । 
सांडावि उपाधी प्रपंचाची ॥५॥

 सर्व परमात्मा सर्व काळी देशीं । 
भाव अहर्निशीं दृढ धरीं ॥६॥

 संत-समुदाय मिळतील जेथें ।
 लोटांगणें तेथें जावें आधीं ॥७॥ 

चिंता नको नाम्या तरसी तूं जाण।
 सांगितली खूण मनें माझ्या ॥८ ॥

नवनीत संपादक - अ. का. प्रियोळकर

अश्या प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपले WhatsApp Channel जॉईन करा.
👇👇