नाहीतर , उगाच तोंडातील माशी तोंडातच घुटमळत ठेवत , जणू काय तोंडाला मास्क लावून तोंड बंद चे लेबल लावलय ? असं वागण्यात काहीही पूर्णतः सिद्ध होणार नाही .
जगले तर स्वावलंबी जगायचं . कोणाच्या जीवावर जगून दिवस काढले तरी जमेल त्या पद्धतीने त्याची परतफेड करायला, स्वतःच मन सक्षम ही करणे हे ही तितकेच गरजेचे आहे . शेवटी आपलं आयुष्य आहे बाकी सर्व नाती एक फॉर्म्यालिटी म्हणून एकमेकांची केसाळलेली गरज या ना त्या नात्याने एकमेकांत गुंतलेली असतात .
जबाबदारी आणि कर्तव्य यापलीकडे वेगळ्या विश्वात वावरून स्वतःच अस्तित्त्व आहे. याची जगाला जाणीव करून देणे गरजेचे आहे नाहीतर; सतत स्वतःला डिवचून मरेपर्यंत ती सल मनात घर करून राहणार , याची शाश्वती अगदी दारात बसलेलं कुत्र सुद्धा देऊन रिकामे होईल.....सो "स्व-अस्तित्त्वाची ओळख जगाला
करून देणे" , एक ठाम असे मनावर बिंबवणारे वाक्य आहे .
त्याला पूर्णतः केल्याशिवाय कोणतीही माघार घेता येणार नाही.
लेखिका - भाग्यलेखा कारंडे, सोलापूर