Top 11 places to visit in pandharpur । पंढरपूर मधील 11 प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळे । Marathisahitya.in

पंढरपूर हे संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आहे. प्रत्येक वर्षी आषाढी कार्तिकी वारीला लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येतात. येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिराबरोबर अजून काही आकर्षक स्थळे आहेत त्यांना आवर्जून भेट द्या. वारी निमित्त पंढरपूरला चाललाय तर या ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका.

1 ) विठ्ठल रुक्मिणी मंदिर, पंढरपूर 
संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेले पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे येथील प्रमुख आकर्षण आहे. मंदिरासमोरच नामदेव पायरी व संत चोखामेळा यांची समाधी आहे.

2) श्री पुंडलिक मंदिर, पंढरपूर 
त्यानंतर चंद्रभागा नदीच्या काठावर वसलेले पुंडलिक मंदिर याला नक्की भेट द्या. 

3) चंद्रभागा नदी 
विठ्ठल मंदिरापासून जवळच चंद्रभागा नदी वाहते. चंद्रभागा नदीत स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते. भिमा नदीचा आकार येथे चंद्रासारखा झाला आहे म्हणून तिला येथे चंद्रभागा म्हणून ओळखतात.

4) प्रभुपाद घाट
 
ISCKON या संस्थेमार्फत चंद्रभागेच्या तीरी प्रभुपाद घाटाची निर्मिती करण्यात आली आहे. अतिशय सुंदर व मनमोहक अशी घाटाची रचना केली आहे. येथे रोज दुपारी 12 वाजता ISCKON संस्थेमार्फत मोफत अन्नदान केले जाते. 

5) श्री श्री राधा पंढरीनाथ मंदीर / ISCKON temple, Pandharpur
पंढरपूर मध्ये आलाय तर isckon temple ला भेट द्यायला विसरू नका. राधा कृष्णाचे मनमोहक रूप पाहून मन अगदी प्रसन्न होते. दुपारी 1 ते 4 या वेळेत वेळेत मंदीर बंद असते.  येथे जवळच गोशाळा आहे. व राहण्यासाठी भक्त निवास ही आहे.

6) श्री द्वारकाधीश मंदीर
विठ्ठल मंदिरापासून चंद्रभागा नदीकडे जाताना हे मंदीर आहे.

7) चंद्रभागा मंदिर , पंढरपूर 
 या मंदिराला श्री कृष्ण चैतन्य चंद्रभागा मंदिर असे म्हणतात. चंद्रभागा नदीच्या काठावर प्रभुपद घाटाजवळ हे सुंदर मंदीर आहे.

8) कैकाडी महाराज मठ, पंढरपूर 
कैकाडी महाराज मठ या ठिकाणी आपल्याला विविध धार्मिक प्रतिकृती पाहायला मिळतात. चार धाम, ऋषी-मुनी, विविध धार्मिक प्रसंग यांच्या प्रतिकृती येथे साकारण्यात आल्या आहेत. 

9) गजानन महाराज मंदिर, पंढरपूर 
गजानन महाराज संस्थान, शेगांव ट्रस्ट तर्फे पंढरपूरमध्ये या उत्कृष्ट मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. हे मंदीर संपूर्ण व्हाइट मार्बल मध्ये बनवलेले आहे. या मंदिराशेजारी राम मंदीर सुद्धा आहे त्यालाही अवश्य भेट द्या.

10) तुळसी वृंदावन, पंढरपूर 
महाराष्ट्र शासनातर्फे तुळसी वृंदावन ची निर्मिती करण्यात आली आहे. येथे विविध प्रकारच्या तुळशी पाहायला मिळतील. तसेच येथे विठ्ठलाची भव्य प्रतीकृती साकारण्यात आली आहे.

11) तनपुरे महाराज मठ, पंढरपूर 
पंढरपूर मधील हा एक सुप्रसिद्ध मठ आहे. येथे मठात देवीदेवतांच्या काही भव्य प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत.

Tags - पंढरपूरमधील प्रेक्षणीय स्थळे, Top visiting places in pandharpur, Pandharpur full information, pandharpur tourism, pandharpur tour, पंढरपूर सहल, पंढरपूर संपूर्ण माहिती, आषाढी एकादशी, पंढरपूर वारी, varkari, vari, pandharpur vari, वारकरी, विठ्ठल-रुक्मिणी, vitthal rukmini mandir,