ढोल-ताशांचा गजरात आणि "गणपती बाप्पा मोरया"च्या जयघोषात अवघा महाराष्ट्र आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. चैतन्य, उत्साह आणि मांगल्याचा हा सण म्हणजे गणेश चतुर्थी. आपल्या नातेवाइकांना, मित्र-मैत्रिणींना आणि प्रियजनांना या खास दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत सर्वोत्तम गणेश चतुर्थी शुभेच्छा संदेश (Wishes), व्हॉट्सॲप स्टेटस आणि बाप्पाचे सुंदर कोट्स. या लेखातील संदेश वापरून तुम्ही या उत्सवाचा आनंद द्विगुणित करू शकता.
मोदकांचा प्रसाद केलालाल फुलांचा हार सजवलामखर नटून तयार झाले,वाजत गाजत बाप्पा आलेगणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !
श्रावण सरला, भाद्रपद आलाचतुर्थीची पहाट आली,सज्ज व्हा फुले उधळायलागणाधिशाची स्वारी आलीगणपती बाप्पा मोरया!
गणराया तुझ्या येण्याने
सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले
असाच आशीर्वाद राहू दे…
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !
आजपासून सुरू होणा-या गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा....बुद्धीची देवता असलेला गणपतीराया आपणा सर्वांना सुख,समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो,अशी त्याच्या चरणी प्रार्थना.
वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटी समप्रभनिर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा
गणपती तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करोत.., तुम्हाला सुख समृद्धि, भरभराटी आणि उत्तम आरोग्य लाभो हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना....
बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन…
गणपती बाप्पा मोरया,
मंगल मूर्ती मोरया…
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले
दुःख आणि संकट दूर पळाले
तुझ्या भेटीची आस लागते
तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते
अखेर गणेश चतुर्थीला भेट घडते…
श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.