पुण्यातील हे सुंदर कृष्ण मंदिर कधी पाहिलंय काय ? हरे कृष्ण मंदिर, कोंढवा-कात्रज, पुणे । Iskcon temple Pune

          श्री श्री राधा वृंदावनचंद्र मंदीर, कोंढवा- कात्रज, पुणे यालाच Iskcon temple किंवा Iskcon NVCC temple म्हणून सुद्धा ओळखतात. हे मंदीर आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (ISKCON) या संस्थेद्वारे चालवले जाते. मंदिराचा परिसर अतिशय सुंदर व मनमोहक आहे. तर मग तुम्ही कधी भेट द्यायला येताय ?


           स्वारगेट बस स्थानकापासून हे मंदीर फक्त 7.5 k.m तर कात्रज चौकापासून फक्त 2.5 km अंतरावर आहे. तुम्हाला येथे जाण्यासाठी स्वारगेट तसेच कात्रज मधून pmpml च्या बस मिळतील. किंवा स्वारगेट वरून कात्रज ला pmpml बसने यायचे आणि तेथून 10 रुपयात शेअरिंग रिक्षा मिळतील ज्या तुम्हाला मंदिरापाशी सोडतील. 


            मंदिरामध्ये राधा-कृष्ण, गौराई-निताई आणि जगन्नाथ यांचे सुंदर विग्रह आहेत. मंदिरामध्ये प्रवेश करताच सुरुवातीला श्रीकृष्ण कालियामर्दन करताना भव्य देखावा आहे. व शेजारीच गार्डन सुद्धा आहे. व तिथे जवळचं बुकस्टोअर सुध्दा आहे त्यामध्ये सर्व आध्यात्मिक पुस्तके जसे की भगवदगीता, श्रीमद् भागवत, कृष्ण चरित्र अगदी योग्य किमतीत मिळतील. 

          या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला बालाजी मंदिर आहे. तेही अतिशय सुंदर आहे. बालाजी मंदिर ही इस्कॉन या संस्थेचेच आहे. आता सर्व फिरायच झाल्यावर भूक तर लागेल ना ? तर इथेच इस्कॉन संस्थेचे गोविंदा'ज रेस्टॉरंट आहे. येथे अगदी शुद्ध व सात्विक पद्धतीने बनवलेले पदार्थ व जेवण मिळते. येथील जेवणात कांदा व लसूण वापरला जात नाही पण तरीही जेवण खुप टेस्टी असते एकदा तरी नक्की खाऊन पहा. 

        जर तुम्ही परगावाहून आला असेल तर इथे राहण्यासाठी त्यांचे अतिथी भवन सुध्दा आहे. इथे तुमची माफक दरात राहण्याची उत्तम सोय होईल. तर कधी येताय मग तुम्ही या मंदिराला भेट द्यायला ? 

हरे कृष्ण |